मुंबई : सेल्फी काढण्यासाठी बॅण्डस्टँड समुद्रकिनारी गेलेल्या 3 तरुणींचा अचानक पाय घसरला आणि त्या समुद्रात पडल्या. त्या ३ तरुणी बुडत असल्याचं पाहुण एका तरुणाने स्वत:च्या जिवाची जराही परवा न करता समुद्रात उडी घेतली.
जोरदार लाटेच्या प्रवाहातही रमेश वळूंजे या तरुणाने समुद्रात उडी घेवून २ तरुणींचे जीव वाचवले पण तिसऱ्या मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या रमेशवर काळाने घाला घातला. समुद्रात जोरदार लाट आल्यामुळे ती रमेशला सोबत घेवून गेली.
रमेश वळूंज हे बॅण्डस्टँडजवळील जाफर बुवा कॉलनीत राहत असून ते शिवसेनेचे गटप्रमुख होते. रमेश वळंजू यांची पत्नी कल्पना, मुलगी रवीना (१५) आणि मनश्री (१२), मुलगा हृदय हे त्या जिगरबाज रमेशची अजूनही वाट पाहत आहेत.