मुंबई : उद्धव ठाकरे यांनी युतीच्या चर्चेसाठी शिवसेनेच्या मंत्र्यांची मातोश्रीवर नुकतीच बैठक पार पडलीय. शिवसेना मंत्री रामदास कदम, सुभाष देसाई, दिपक सावंत, विजय शिवतारे, अर्जुन खोतकर तसंच खासदार अनिल देसाई, आमदार सुनिल प्रभू, अनिल परब हे या बैठकीसाठी उपस्थित होते. काल शिवसेनेच्या विभाग प्रमुखांशीही उद्धव ठाकरेंनी युती संदर्भात चर्चा केली होती.
युतीसंदर्भात अंतीम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील असं या बैठकीनंतर सांगण्यात येतंय.
दरम्यान, भाजप शिवसेनामध्ये मुंबईच्या जागा वाटपबाबत आज पहिली बैठक होणार आहे. मुंबईतबाबतची ही पहिली आणि प्राथमिक बैठक असेल.
भाजपकडून आशिष शेलार, विनोद तावडे आणि प्रकाश मेहता हे चर्चा करतील. तर शिवसेना कडून सुभाष देआई, अनिल देसाई आणि अनिल परब या बैठकीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.