गडकरी-मुंडे भेटीत प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा

मुंबईतल्या भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरींच्या निवासस्थानी गडकरी आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्षपदाबाबत अर्धा तास चर्चा झाली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 8, 2013, 11:01 PM IST

www.24taas.com,
मुंबईतल्या भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरींच्या निवासस्थानी गडकरी आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्षपदाबाबत अर्धा तास चर्चा झाली.
प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याचा निर्णय 16 फेब्रुवारीपर्यंत एकमताने घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिलीय. त्यामुळं प्रदेशाध्यक्षपदाचा तोडगा निघण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी गडकरी आणि मुंडे गटातला संघर्ष आता शिगेला पोचलाय. एकीकडे एकमतानं अध्यक्ष निवडण्याची ग्वाही दोन्ही गटांचे नेते देत आहेत, तर दुसरीकडे मुनगंटीवार यांना हटवून आपला समर्थक प्रदेशाध्यक्ष बनवण्यासाठी मुंडेंचं दबावतंत्र सुरु आहे. त्यामुळेच खासदार रावसाहेब दानवेंपाठोपाठ आता मुंडे समर्थकांनी पश्चिम महाराष्ट्रातलाच प्रदेशाध्यक्ष हवा अशी मागणी करून नव्या वादाला तोंड फोडलंय.