www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण आम आदमी पक्षाला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यांनी पक्ष प्रवेश केला नसला तरी संपूर्ण प्रक्रियेत ‘आप’ला पाठिंबा असल्याचं त्या म्हणाल्या. शिवाय आम आदमी पक्षासोबत आणखी चर्चा सुरू असून १६ आणि १७ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत अधिक चर्चा होऊन निर्णय सांगणार असल्याचंही मेधा पाटकर म्हणाल्या.
अजून काय म्हणाल्या मेधा पाटकर
सध्याचं राजकारण भ्रष्ट, राजकारणाच्या नावानं लूट होतेय
अनेक कायदे जनआंदोलनामुळेच झाले
वीज, जमीन, सरकारी तिजोरीची लूट सुरूय
अण्णांच्या आंदोलनामुळे देशात जागृती
जनआंदोलनाला राजकारण अस्पृश्य नाही
लवासा, कॉमनवेल्थमध्ये जमिनीची लूट
आपच्या जाहीरनाम्यात सामान्यांचे मुद्दे
जनआंदोलन सुरूच राहणार
आम आदमी पक्षात मेधा पाटकर सहयोग करणार
मेधा पाटकरांचा आम आदमी पक्षाला पाठिंबा
मेधा पाटकरांची मुंबईत घोषणा
निवडणूक प्रक्रियेत आपला पाठिंबा, चर्चा सुरू
जनआंदोलन-आपमध्ये संवाद साधण्याचं काम
मेधा पाटकर `आप`ला पूर्ण पाठिंबा
१६ आणि १७ जानेवारीला होणार `आप`सोबत चर्चा
आप`च्या कार्यात सक्रिय सहभाग
आम आदमी पक्षात जाण्याची घोषणा नाही, पाठिंबा जाहीर
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.