आमच्याकडून वाद संपला, मांसबंदीवरून वाद का निर्माण झाला : उद्धव

मांसविक्रीच्या बंदीवरून वाद नेमका कुणामुळे निर्माण झाला याचा शोध घेणार असल्याचं आज उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. आज जैन धर्मियांच्या प्रतिनिधींनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेच्या बाजूनं या वादावर पडदा टाकल्यचंही उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.

Updated: Sep 13, 2015, 03:33 PM IST
आमच्याकडून वाद संपला, मांसबंदीवरून वाद का निर्माण झाला : उद्धव title=

मुंबई : मांसविक्रीच्या बंदीवरून वाद नेमका कुणामुळे निर्माण झाला याचा शोध घेणार असल्याचं आज उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. आज जैन धर्मियांच्या प्रतिनिधींनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेच्या बाजूनं या वादावर पडदा टाकल्यचंही उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.

मांसविक्रीवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे शिवसेना, मनसे आक्रमक झाली होती. चुलीपर्यंत बंदी घालाल तर सहन करणार नाही असा सज्जड दम उद्धव ठाकरेंनी दिला होता. तर राज ठाकरेंनी आम्ही काय खायचं हे जैनांनी ठरवू नये, असा इशारा दिला होता. यावर काल १० हजार जैन धर्मियांनी भाईंदरला उपोषण केलं. आणि आज जैन धर्मियांच्या प्रतिनिधींनी उभा राहिलेला वाद मिटवण्याच्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंची भेट घेतली. 

जैन बांधव गेल्या अनेक वर्षांपासून पर्युषण पर्व पाळतात. मग याचवेळी मांसबंदीवरून वाद का निर्माण झाला, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी रविवारी विचारला. आमच्याकडून या वादावर आधीच पडदा टाकण्यात आला आहे. पर्युषण पर्व पाळण्यास शिवसेनेचा विरोध कधीही नव्हता. सक्तीच्या शाकाहाराची भूमिका मान्य नव्हती; पण आता शिवसेनेच्या दृष्टीने हा विषय संपला असून तो आम्हाला अधिक वाढवायचा नाही, असे उद्धव यांनी स्पष्ट केलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.