मुंबई : रस्ते घोटाळा प्रकरणातील अहवालात काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केलेल्या कंपनीच्या अधिकारी आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांची आज महापौर बंगल्यावर भेट झाली.
काल महापौरांनी अहवाल सादर केल्यानंतर लगेचच आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमाराला ही बैठक झाली. मात्र ठपका ठेवलेल्या कंपनीच्या अधिका-यांसोबत बैठक घेण्याचं कारणच काय, असा सवाल आता उपस्थित होतोय.
मुंबईतील रस्त्यांच्या कामात झालेल्या अनियमिततेबाबतच्या चौकशीचा अहवाल महापौर स्नेहल आंबेकर यांच्याकडे आयुक्त अजॉय मेहतांनी सुपूर्द केला...
रस्त्याच्या कामांमध्ये 50 टक्के अनियमतता आढळल्याचं सांगत प्रशासनातले बडे मासे जाळ्यात अडकणार असल्याचंही महापौरांनी सांगितल होत... या सर्व घडामोडींना 24 तास उलटण्याच्या आधीच एका ब्लॅक लिस्टेड कंपनीच्या अधिका-यांनी मुंबईच्या महापौरांची महापौर बंगल्यावर जाऊन भेट घेतल्यानं अनेक प्रश्न निर्माण झालेत....
IRS कंपनीचे उपाध्यक्ष शरद देवगेकर आणि व्यवस्थापक प्रदीप कवटेकर हे या बैठकीसाठी आले होते. या कंपनीला काळ्या यादीत टाकून नोंदणी रद्द करावी आणि कंपनीवर गुन्हा नोंदवावा, अशी शिफारस अहवालात करण्यात आलीय. या दृश्यांमध्ये आपण ही भेट झालेली स्पष्ट पाहू शकतायं... या कंपन्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते प्रविण छेडा यांनी केलायं....
महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्यांना खाजगीरित्या भेटणे नैतिकतेला धरून नाही. या कंपन्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नये, अस म्हणत भाजपचे मुंबई अध्यक्ष अशिष शेलार यांनीही महापौरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलायं...
या सर्व घडामोडींनंतर आता महापौर यावर काय भाष्य करतात हे पहाण महत्त्वाच ठरणार आहे... आगामी मुंबई महापालिका निवडणूकीत भाजप आणि सेना हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढण्याच्या मानसिकतेत असल्याच नुकतच उध्दव ठाकरे यांनी म्हणटल होतं... निeवडणूकी आधी महापौरांची ही भेट विरोधकांसाठी आणि भाजपासाठी आयत कोलीत ठरते का हे आता येणा-या दिवसांमध्ये स्पष्ट होईल...