परीक्षेआधीच गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

12 वीच्या सायन्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थांचा आज झालेला गणिताचा पेपर फुटल्याचं बोर्डानं स्वतःच कबुल केलंय. आज सकाळी 10 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास बोर्डालाच सोशल मीडियावर व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका सापडलीय. 

Updated: Mar 6, 2017, 01:59 PM IST
परीक्षेआधीच गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : 12 वीच्या सायन्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थांचा आज झालेला गणिताचा पेपर फुटल्याचं बोर्डानं स्वतःच कबुल केलंय. आज सकाळी 10 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास बोर्डालाच सोशल मीडियावर व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका सापडलीय. 

आज सकाळीच गणिताच पेपर होता. साधारण अर्धातास आधी पेपर फुटल्याचं पुढे आलंय. याआधी फिजिक्स आणि मराठीचाही पेपऱ फुटल्याचा संशय व्यक्त होतोय. 

त्याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटकही झालीय. पण आज सलग तिसऱ्या दिवशी पेपर फुटल्यानं या प्रकरणी सरकारही तितकसं गंभीर नसल्याचं स्पष्ट आहे. 

दरम्यान आज सकाळी या पेपरफुटीचे पडसाद विधीमंडळातही उमटले. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विनोद तावडेंवर टीका केलीय.