maths paper

Pune News : खळबळजनक! पुण्यात दहावीचा गणित भाग 1 चा पेपर फुटला?

इयत्ता दहावीची परीक्षा सुरु असून, सध्या विद्यार्थ्यांच्या नजरा परीक्षेच्या अंतिम पेपरकडे लागल्या आहेत. असं असतानाच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात दहावीचा गणित भाग एकचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा पेपर महिला सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळल्याने एकच खळबळ माजली. या महिला सुरक्षा रक्षकावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

Mar 16, 2023, 10:19 AM IST

HSC Exam 2023 : ...म्हणून कॉलेज ट्रस्टीच्या 23 वर्षाच्या मुलीनेच बारावीचा पेपर फोडला; मुंबई क्राईम ब्रँचच्या तपासात धक्कादायक खुलासा

HSC Exam 2023 Paper Leak : दादर येथील नामांकित कॉलेजमध्ये पेपर फुटीचा प्रकार घडला. याचे कनेक्शन अहमदनगरमध्ये आढळून आले आहे. मुंबई क्राईम ब्रँचने केलेल्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.  

Mar 8, 2023, 11:50 PM IST

HSC Exam 2023 : बुलढाण्यानंतर मुंबईतही बारावीचा गणिताचा पेपर फुटला; दादर मधील नामांकित कॉलेजमधील प्रकार

HSC Exam 2023 :  दादर येथील नामांकित कॉलेजमध्ये पेपर फुटीचा प्रकार घडला आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रात परवानगी नसतानाही मोबाईल फोन घेऊन गेला. त्याचा फोनचा तपासला असता त्यात गणिताचा पेपर आढळला. 

Mar 5, 2023, 11:04 PM IST

HSC Exam 2023 : 12 वीचा पेपर फुटला, गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

 HSC Exam Paper Leak : बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटला आहे. बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी 10.30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (HSC Exam) 12 वीचा हा फुटलेला पेपर झी 24 तासच्या हाती लागला आहे. हा गणिताचा पेपर कुणी फोडला...? पेपर व्हायरल करण्यामागे कुणाचा हात आहे...? यामागे रॅकेट सक्रिय आहे का...? याचा तपास केला जात आहे.

Mar 3, 2023, 12:45 PM IST

परीक्षेआधीच गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

12 वीच्या सायन्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थांचा आज झालेला गणिताचा पेपर फुटल्याचं बोर्डानं स्वतःच कबुल केलंय. आज सकाळी 10 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास बोर्डालाच सोशल मीडियावर व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका सापडलीय. 

Mar 6, 2017, 01:58 PM IST