हॉस्पीटलमध्ये सुरक्षेसाठी हवेत बाऊन्सर्स - डॉक्टरांची मागणी

केईएम हॉस्पीटलच्या डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर आज सलग दुसऱ्या दिवशीही संप सुरूच ठेवून डॉक्टरांनी सामान्य नागरिकांना वेठीस धरलंय. इतकंच नाही तर, उद्या रात्री 8.00 पर्यंत मारहाण करणाऱ्या पेशंटच्या उर्वरित दोन नातेवाईकांना अजामिनपात्र कलम ३२८ नुसार अटक झाली नाही तर राज्य भरातील डॉक्टर संपावर जातील, असंही मार्डनं म्हटलंय. तसंच डॉक्टरांवर केली जाणारी क्रॉस एफआयआर केली जाऊ नये, अशीही मागणी डॉक्टरांनी केलीय. 

Updated: Sep 26, 2015, 06:47 PM IST
हॉस्पीटलमध्ये सुरक्षेसाठी हवेत बाऊन्सर्स - डॉक्टरांची मागणी title=
फाईल फोटो

मुंबई : केईएम हॉस्पीटलच्या डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर आज सलग दुसऱ्या दिवशीही संप सुरूच ठेवून डॉक्टरांनी सामान्य नागरिकांना वेठीस धरलंय. इतकंच नाही तर, उद्या रात्री 8.00 पर्यंत मारहाण करणाऱ्या पेशंटच्या उर्वरित दोन नातेवाईकांना अजामिनपात्र कलम ३२८ नुसार अटक झाली नाही तर राज्य भरातील डॉक्टर संपावर जातील, असंही मार्डनं म्हटलंय. तसंच डॉक्टरांवर केली जाणारी क्रॉस एफआयआर केली जाऊ नये, अशीही मागणी डॉक्टरांनी केलीय. 

याशिवाय, अशा घटना भविष्यात टाळता याव्यात यासाठी आपल्या काही मागण्याही डॉक्टरांनी यानिमित्तानं समोर ठेवल्यात... 
- पेशंटचे दोनच नातेवाईक हॉस्पिटलमध्ये थांबतील 
- हॉस्पीटलमध्ये सीसीटीव्ही कॅमेर बसवावे आणि असलेले कॅमेरे मेन्टेन ठेवावेत
- 24 X 7 सुरू राहील असा हेल्पलाईन नंबर (7402) डॉक्टरांसाठी सुरू करावा 
- केईएम, सायन आणि जे जे हॉस्पिटलचा सुरक्षा अहवाल द्यावा 
 
पुढील मागण्या १० दिवसांत लिखित स्वरुपात मान्य व्हायला हव्यात असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे...  
- 32 महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडाळाचे सुरक्षा रक्षक सुरक्षेकरता द्यावेत.
- वॉर्डमध्ये पास सिस्टम सुरु करावी
-  24 तास 4 बाऊंसर डॉक्टरांच्या सुरक्षेकरता हॉस्पीटलमध्ये तैनात असावेत 
- हॉस्पिटलमध्ये असलेले कॅमेरे सुरु असावेत तसंच 145 नवीन सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.