मुंबई : रेल्वे प्रशासनात माहिती अधिकारात मागणीचा अर्ज मराठीत केला म्हणून उत्तर नाकारले हा प्रकार झाल्याने केंद्र सरकारच्या कार्यालयात होणारी मराठीची गळचेपी समोर आलीय.
विमानतळ आणि रेल्वेतील फलकावर मराठीतून सूचना नसणे याबाबत ६२ वर्षीय प्रमोद काळकर यांनी १९९५ पासून पाठपुरवठा केला आहे. मुख्यमंत्री, रेल्वे प्रशासन, विमान प्राधिकरण, आयकर कार्यालय, सीमाशुल्क विभाग या सर्वांकडे पाठपुरावा करत आहेत. यावर अदध्यादेशही निघाले, मात्र अंमलबजावणी झाली नसल्यानं खंत व्यक् केलीय.
दरम्यान, अलिकडेच रेल्वेने महिती अधिकारातील मराठी अर्ज फेटाळत हिंदीतून करण्याचा फतवा काढला होता. याबाबत तीव्र विरोध झाल्यानंतर रेल्वे प्रशासन वठणीवर आले. महाराष्ट्रात मराठीची गळचेपी होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.