31 जानेवारीला मुंबईत धडकणार मराठा मुक मोर्चाचं वादळ

मराठा समाजाच्या झालेल्या बैठकीत मुंबई मोर्चाची तारीख ठरली आहे. 31 जानेवारीला दुपारी 1 वाजता हा मुंबईत मोर्चा निघणार आहे. मरीन ड्राइव्ह ते आझाद मैदान असा हा मुक मोर्चा असणार आहे.

Updated: Jan 5, 2017, 04:46 PM IST
31 जानेवारीला मुंबईत धडकणार मराठा मुक मोर्चाचं वादळ  title=

औरंगाबाद : मराठा समाजाच्या झालेल्या बैठकीत मुंबई मोर्चाची तारीख ठरली आहे. 31 जानेवारीला दुपारी 1 वाजता हा मुंबईत मोर्चा निघणार आहे. मरीन ड्राइव्ह ते आझाद मैदान असा हा मुक मोर्चा असणार आहे.

राज्यस्तरीय निवेदन या वेळी मराठा समाजाकडून सरकारला देण्यात येणार आहे. सरकार मराठा समाजाचे ऐकेल असा विश्वास असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. मात्र मुंबई मोर्चानंतर ही मागण्या मान्य झाल्या नाही तर यापुढे काय करायचे याचा निर्णय बैठकीत घेण्यात येईल असं बैठकीला हजर असलेल्या पदाधिकाऱ्यांनी संगितलं.