मुंबई : मुंबईसह राज्यामध्ये मराठा समाजातर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येणारेय.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कोपर्डीमध्ये झालेल्या अत्याच्याराच्या घटनेमधील आरोपींना फाशी द्यावी, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागण्या घेवून हे चक्का जाम आंदोलन करण्यात येणारेय.
मुंबईत दादर इथल्या शिवाजी मंदिर इथं या चक्का जाम आंदोलनाच्या तयारीची नुकतीच बैठक पार पडली होती. त्यावेळी मुंबईमध्ये हे चक्का जाम आंदोलन कसं यशस्वी करण्यात येईल याबद्दल रणनिती आखण्यात आली.