महाराष्ट्रातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी झाली आई

6 ऑगस्ट 1986 ला मुंबईमध्ये पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीनं जन्म घेतला.

Updated: Mar 7, 2016, 04:45 PM IST
महाराष्ट्रातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी झाली आई title=

मुंबई: 6 ऑगस्ट 1986 ला मुंबईमध्ये पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीनं जन्म घेतला. हर्षा चावडा असं तिचं नाव. आता 29 वर्षांची असलेली हर्षा आता आई झाली आहे. 

सोमावरी हर्षानं मुलाला जन्म दिला आहे. वडिल झाल्यामुळे मी आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया हर्षाचा नवरा दिव्यपाल शहानं दिली आहे. 

मुंबईच्या जस्लोक हॉस्पिटलमध्ये गायनोकोलोजिस्ट डॉक्टर इंदिरा हिंदूजा आणि कुसुम झवेरी यांनी हर्षाची डिलिव्हरी केली. मुख्य म्हणजे हर्षाच्या जन्मावेळीही इंदिरा हिंदूजाच डॉक्टर होत्या.