www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्र नंबर वन होणार... असा विश्वास उद्योगमंत्री नारायण राणे व्यक्त केला आहे. नारायण राणे यांनी तरूणांना अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असेही म्हटंले आहे. या वक्तव्यामुळे राज्याचं नव औद्योगिक धोरण जाहीर झालं आहे. राज्याचा समतोल औद्योगिक विकास साधण्यासाठी उद्योगांच्य़ा विकेंद्रीकरणावर भर देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या भागांमध्ये उद्योग उभारणाऱ्यांना खास सवलतींची घोषणा करण्यात आल्या आहेत. नक्षलवादी आणि आदिवासी भागांमध्ये ५०० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना व्हॅट पूर्णपणे माफ करण्यात आलं आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्हॅटमध्ये ९० टक्के सूट देण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योग उभे करणाऱ्यांना स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी आणि इलेक्ट्रीसीटीचा परतावा मिळणार आहे.
नवीन औद्योगिक धोरणामुळं राज्यात पाच लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. नव्या औद्योगिक धोरणामुळं महाराष्ट्र देशात नंबर एकवर जाईल, असा विश्वास उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.