महाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळ फॅमिलीवर २० हजार पानांचे आरोप पत्र

भुजबळ फॅमिलीसह १७ जणांवर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने तब्बल २० हजार पानांचे आरोप पत्र मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे. 

Updated: Feb 24, 2016, 03:56 PM IST
महाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळ फॅमिलीवर २० हजार पानांचे आरोप पत्र title=

मुंबई : भुजबळ फॅमिलीसह १७ जणांवर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने तब्बल २० हजार पानांचे आरोप पत्र मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे. 

२० हजार पानांचे आरोपपत्र दोन लोखंडी पेट्यांमध्ये न्यायालयात नेण्यात आले. या आरोपपत्रात छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळसह एकूण १७ जणांवर आरोप ठेवण्यात आलेत. 

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात आरोपींनी कंत्राटरदारांवर ८० टक्के नफा मिळवून दिलाय. तसच त्या बदल्यात इतर कामं आणि रोख घेतल्याचे आरोपपत्रात नमुद करण्यात आलंय. आता यावर न्यायालयात कधी सुनावणी सुरु होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलंय.