मुख्यमंत्र्यांचे राष्ट्रवादीला खडे बोल

आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं जास्त जागांची मागणी केल्यावर काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात.

Updated: Jun 17, 2014, 05:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं जास्त जागांची मागणी केल्यावर काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात.
"आघाडीबाबत बोलायची गरज नाही. मी लोकांसाठी निर्णय घेतो आणि लोक आपल्याला पाठिंबा देतील", असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
तर काँग्रेस प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली आहे.
राष्ट्रवादीला आमच्यामुळेही मतं मिळतात. जागावाटपाची जाहीर चर्चा करण्यापेक्षा त्यांच्या काही मागण्या असतील, तर आमच्याशी बोलावं, असा सल्लाही दलवाई यांनी दिलाय.
मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जास्त जागांची मागणी पुढे आली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.