सतत हसवणारा ‘स्वानंद’ सर्वांना रडवून गेला!

२४ तास सतत हसत राहणारा आणि सर्वांना हसवत ठेवणारा स्वानंद आज आमच्यातून कायमचा निघून गेला... 'झी २४ तास'चा प्रोड्युसर स्वानंद कुलकर्णी याचे आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. स्वानंद केवळ २९ वर्षांचा होता. त्याच्या पार्थिवावर डोंबिवलीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

Updated: Nov 11, 2014, 10:01 AM IST
सतत हसवणारा ‘स्वानंद’ सर्वांना रडवून गेला! title=

डोंबिवली: २४ तास सतत हसत राहणारा आणि सर्वांना हसवत ठेवणारा स्वानंद आज आमच्यातून कायमचा निघून गेला... 'झी २४ तास'चा प्रोड्युसर स्वानंद कुलकर्णी याचे आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. स्वानंद केवळ २९ वर्षांचा होता. त्याच्या पार्थिवावर डोंबिवलीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोमवारी सकाळी जीममध्ये व्यायाम करत असताना, अस्वस्थ वाटू लागल्यानं त्याला डोंबिवलीच्या ओम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तिथंच आमच्या या मित्रानं अखेरचा श्वास घेतला. एबीपी, साम टीव्ही, टीव्ही 9 आणि झी २४ तास अशा विविध न्यूज चॅनल्समध्ये स्वानंदनं आपल्या कामानं छाप पाडली. गेल्या दोन वर्षांपासून झी २४ ताससाठी त्यानं आषाढीची 'आनंदवारी' सर्वोत्तम पद्धतीनं कव्हर केली. 

आपल्या खास मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजानं तो अनेक बातम्यांमध्ये प्राण ओतायचा. मात्र संगीत, नाटक आणि अभिनयाची आवड असलेल्या स्वानंदनं अशी अकस्मात एक्झिट घेणं सर्वांसाठीच शॉकिंग होतं. 'झी २४ तास'चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी तमाम 'झी परिवारा'च्या वतीनं स्वानंदला श्रद्धांजली वाहिलीय. स्वानंद, मित्रा, आज पहिल्यांदाच रडवलंस.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.