महानंदाचे दूध २ रुपयांनी स्वस्त

 दुधाच्या दरावरून दूध कंपन्या आणि विक्रेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. दरम्यान, महानंदाने दुधाचे लीटरमागे २ रुपये कमी केले आहेत. त्यामुळे महानंदाचे दूध ४० रुपयांवरून ३८ रुपये झाले  आहे.

Updated: May 26, 2015, 09:42 AM IST
महानंदाचे दूध २ रुपयांनी स्वस्त title=

मुंबई :  दुधाच्या दरावरून दूध कंपन्या आणि विक्रेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. दरम्यान, महानंदाने दुधाचे लीटरमागे २ रुपये कमी केले आहेत. त्यामुळे महानंदाचे दूध ४० रुपयांवरून ३८ रुपये झाले  आहे.

सरकारी आणि खासगी दूध वितरण कंपन्यांनी दुधाचे दर प्रतिलिटरमागे दोन ते पाच रुपयांनी कमी करावेत, असे आदेश देण्यात आले असल्याची माहिती दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. त्यानुसार महानंदने दुधाचे प्रतिलिटर दर ४० रुपयांवरून ३८ रुपये केले. तर आरेही दुधाचे दर ३५ रुपये करणार असल्याची माहिती खडसे यांनी दिली. 

गोकूळने दुधाचे दर ३९ रुपये केले आहेत. अन्य खासगी दूध वितरण कंपन्यांनाही दूध विक्रीचे दर कमी करण्याची सुरुवातीला विनंती करण्यात येईल, जर दुधाचे दर कमी केले नाही तर कंपन्यांवर कारवाई करण्याचे अधिकार सरकारकडे आहेत, असे खडसे यांनी सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.