'जादू'नं चोर पकडणारा पोलीस अधिकारी!

पोलिसांच्या वेगवेगळ्या छटा आजवर तुम्ही पहिल्या असतील. पण आज आपण पोलीस जगतातील जादूगाराला भेटणार आहोत... 

Updated: Mar 10, 2017, 10:42 AM IST
'जादू'नं चोर पकडणारा पोलीस अधिकारी! title=

अजित मांढरे, मुंबई : पोलिसांच्या वेगवेगळ्या छटा आजवर तुम्ही पहिल्या असतील. पण आज आपण पोलीस जगतातील जादूगाराला भेटणार आहोत... 

पोलीस निरीक्षक सुभाष दगडखैर... तब्बल तीन हजार जादूच्या खेळात पारंगत असलेले दगडखैर हे जादूगर तर आहेतच पण ते एक पोलीस अधिकारीदेखील आहेत... बालपणापासून जादू करण्याचा छंद असलेले दगडखैर १९८२ साली पोलीस खात्यात भरती झाले, १९८५ साली त्यांना अस्थमाचा त्रास सुरु झाला आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना कोणत्याही खेळात मन गुंतवण्याचा सल्ला दिला आणि तेव्हा सुरु झालेली जादूची तपस्या आजही सुरुच आहे.

अशा प्रकारे जादूचे खेळ दाखवून सामन्यांमध्ये पोलिसांची प्रतिमा तर सुभाष दगडखैर यांनी उंचावली आहेच. पण या जादूगारीच्या वेडाने त्यांना एक सेलेब्रिटींचा दर्जादेखील दिलाय. त्यांना कित्येक पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. त्यात जादूच्या जगतातील ऑस्कर म्हणवल्या जाणाऱ्या मर्लिन पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार तसेच 'लिम्का बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड'मध्येदेखील त्यांच्या नावाची नोंद आहे. एवढंच नव्हे तर या जादूचा वापर करून त्यांनी चोरांनादेखील पकडलं आहे

आत्तापर्यंत जादूचे खेळ दाखवून आणि मानाचे पुरस्कार पटकावत दगडखैरांनी पोलीस खात्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहेच. पण निवृत्तीनंतर जादू या कलेला पूर्णपणे वाहून घेण्याचा त्यांचा विचार आहे.