प्रेमविवाहाला नकार दिल्याने मुंबईत आत्महत्या

प्रेम प्रकरणात सायन येथे धक्कादायक घटना घडलेय. प्रेमविवाहाला नकार दिल्याने दोघांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

Updated: Apr 5, 2016, 09:28 AM IST
प्रेमविवाहाला नकार दिल्याने मुंबईत आत्महत्या title=

मुंबई : प्रेम प्रकरणात सायन येथे धक्कादायक घटना घडलेय. प्रेमविवाहाला नकार दिल्याने दोघांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

प्रेमाला विरोध केल्याने प्रेयसीने गळफास घेऊन तर प्रियकराने रेल्वेखाली झोकून आत्महत्या केली. सायन कोळीवाडा येथील घरकुल हाउसिंग सोसायटीमधील प्रेमा देवेंद्र आणि व्यंकटेश पेरुमल (२५) यांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. व्यंकटेशच्या आईने त्यांच्या विवाहाला नकार दिला. त्यामुळे त्यांचा विवाह होऊ शकला नाही.

दरम्यान, आईच्या शब्दापुढे काहीही नाही, असे व्यंकटेशने प्रेमाला सांगितले. लग्नास नकार मिळाल्याने प्रेमाने रागाच्या भरात राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. याची माहिती व्यंकटेशला कळताच त्याला धक्का बसला. तो कामावर जातो असे सांगून बाहेर पडला. कामावर न जाता त्याने वसई रेल्वे स्थानकातील जलद गती मार्गावर लोकलखाली येऊन आत्महत्या केली.

या दोघांच्या आत्महत्येने सायन परिसर हादरला असून या प्रकरणी अण्टॉपहील आणि वसई रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.