मुंबई : चर्चगेट अपघाताची चौकशी चार वरिष्ठ अधिकारी करीत असून या प्रकरणी पुढील दहा दिवसात रिपोर्ट सादर करण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे डीआरएम शैलेंद्र कुमार यांनी सांगितले. या प्रकारामुळे कोणत्याही गाड्या रद्द केल्या नाही. वाहतूक सुरळीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्राथमिक माहितीनुसार मोटरमन दोषी असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे कुमार यांनी सांगितले. या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
काही काळात प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून ट्रेन सुरू करण्याचा प्रयत्न होणार असल्याचेही कुमार यांनी सांगितले. पुढील काळात अधिक मोटरमन आणि संबंधित कर्मचारी कॉन्सिलींगवर भर देऊ असेही कुमार यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.