सेना-भाजप भांडणाचा मुंबईशी काय संबंध - राज ठाकरे

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या विक्रोळीत जाहीर सभेद्वारे मनसेच्या प्रचाराचा शुभारंभ केलाय. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंची पहिलीच प्रचारसभा आहे.

Updated: Feb 14, 2017, 08:15 PM IST
सेना-भाजप भांडणाचा मुंबईशी काय संबंध - राज ठाकरे title=

मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या विक्रोळीत जाहीर सभेद्वारे मनसेच्या प्रचाराचा शुभारंभ केलाय. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंची पहिलीच प्रचारसभा आहे.

राज ठाकरे म्हणतात...

- सेना-भाजप भांडणाचा मुंबईशी काय संबंध - राज ठाकरे

- नोटाबंदीमुळे देशात नवीन काय घडलं? नवीन कॅशलेस भारत कुठंय? नोटबंदीमुळे श्रीमंतांची वाट लागली नाही

- पार्टी विथ डिफरन्स म्हणजे भाजपकडे पैसा... आणि आमच्याकडे नाही... हाच डिफरन्स 

- नुसती पॅकेजची आश्वासन द्यायची पण पैसे आहेत का सरकारकडे? महाराजांचा जो पुतळा उभारणार ते म्हणतात त्यासाठी ८ हजार कोटी लागतील.... आहेत का? कोण ठेवणार तुमच्या शब्दावर विश्वास? मुख्यमंत्र्यांना टोला

- शिवसेनेनं मुंबईसाठी काय केलं?

- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठीचे साडे सहा हजार कोटी कुठे गेले?

- भूलथापांना बळी पडून मतदान करू नका

- दरवर्षी खड्डे बुजवायचं कंत्राट का द्यावं लागतं?

- बाळासाहेबांचा फोटो का वापरता?

- मुंबई महापालिकेचा आरोग्यावर ५ वर्षात काही हजार कोटी रुपये आरोग्यावर खर्च झाले, ते गेले कुठे?

- शिक्षणावर हजारो कोटी खर्च झाले तरी मुंबईत मराठी शाळा बंद होतायत आणि ऊर्दु शाळा वाढतायत... याचा अर्थ कोण वाढतंय? कोण येतंय?

- ३७५०० कोटी मुंबई महापालिकेचं बजेट आहे, पगार आणि इतर खर्च वगळून १५००० कोटी उपब्ध होतात. ५ वर्षांतले ७५००० कोटी कुठे गेले?

- मी जे ५ वर्षांत नाशिकमध्ये करून दाखवलं ते यांना २५ वर्षांत करून नाही दाखवता आलं... नाशिकमध्ये या आणि विकासकामं पाहा

- नाशिकसारख्या सुविधा मुंबईत का नाही? नाशिकच्या पाच वर्षांच्या काळात १८ महिने आयुक्त नव्हता तरीही कामं केली

- गेल्या वर्षी पाऊस पडल्यावर चॅनेलवाले मुंबई ठाणे पुण्यातील रस्त्यातील खड्ड्यांच फुटेज शूट करून गेले, त्यांना नाशिकमध्ये एकही खड्डा सापडला नाही

- खड्डे बुजवण्याचं मुंबई महापालिकेचं बजेट आहे दर वर्षांला १०० कोटी.. हे जगात फक्त मुंबईत असेल

- नाशिकमधलं बोटॅनिकल गार्डनला टाटा ट्रस्टने सुरुवातीला ३ कोटी दिले पण आम्ही केलेलं कामं पाहून त्यांनी १४ कोटी दिले

- नाशिकमधलं बोटॅनिकल गार्डनचं काम पाहून रतन टाटा म्हणाले 'वेल डन राज'

- नाशिक सोडून महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरात बोटॅनिकल गार्डनसारखं एकतरी सुंदर उद्यान आहे का?

- १९५२ साली जन्माला आलेला भाजपाला स्वतःचे उमेदवार मिळत नाहीत म्हणून दुसऱ्यांच्या मुलांना पळवतात, हिंमत असेल तर स्वतः मुलं काढा

- भाजपवाल्यांना उमेदवार का सापडत नाहीत? दुसऱ्यांच्या घरात डोकावून पाहायची सवय

- सेनेच्या भ्रष्टाचाराला भाजपचीही साथ

- निवडणुकीच्या काळात फक्त जाहिराती आणि सोशल मीडियाचा वापर करून निवडणुका जिंकल्या जाणार असतील तर मग काय उपयोग विकासकामं करून?

- महापौर बंगला शिवसेनेला हडपायचाय... म्हणून बाळासाहेबांचं नाव वापरतात

- महापौर कुठे जाणार तर राणीच्या बागेत... तिथे बरेच पिंजरे खाली आहेत... तिथे एकच प्राणी असेल तो महापौर

- ज्यांनी मुंबईवर वरवंटा फिरवला त्यांना एकही प्रश्न कुणी विचारत नाही

- उद्योगपतींनी सीएसआर फंडातून कामं नाशिकमध्ये कामं केली पण मुंबईत कामं केली नाहीत कारण सत्ताधाऱ्यांना सीएसआरच्या कामातून पैसे खाता येत नाही

- पैशाच्या जीवावर सेना भाजपकडून निवडणुका लढवणार असतील... पुढची ५ वर्षं कामं करणार नसतील... आणि हे तुम्हाला हे मान्य असेल तर तुमचं शहर तुम्हाला लखलाभ

- राज ठाकरे तुमच्यासमोर आहे... त्याला आणि त्याच्या लोकांना एक संधी द्या