धक्कादायक!.. बीएएमएसच्या अभ्यासक्रमातील पुत्रप्राप्तीचे धडे

एक धक्कादायक बातमी, बीएएमएसच्या तिस-या वर्षाच्या अभ्यासक्रमातील खळबळजनक माहिती समोर आली आहे. बीएएमएसच्या विद्यार्थ्यांना पुत्रप्राप्तीचे धडे देण्यात येत आहेत. पुत्रप्राप्तीसाठी काय करावं यासंदर्भात अभ्यासक्रमात माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे क्षुद्रांचा उल्लेख करत त्यांना पुत्रप्राप्तीसाठी वेगळ्या पद्धती देण्यात आल्या आहेत. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 8, 2017, 01:51 PM IST
धक्कादायक!.. बीएएमएसच्या अभ्यासक्रमातील पुत्रप्राप्तीचे धडे title=

(दीपाली जगताप, झी मीडिया) मुंबई : एक धक्कादायक बातमी, बीएएमएसच्या तिस-या वर्षाच्या अभ्यासक्रमातील खळबळजनक माहिती समोर आली आहे. बीएएमएसच्या विद्यार्थ्यांना पुत्रप्राप्तीचे धडे देण्यात येत आहेत. पुत्रप्राप्तीसाठी काय करावं यासंदर्भात अभ्यासक्रमात माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे क्षुद्रांचा उल्लेख करत त्यांना पुत्रप्राप्तीसाठी वेगळ्या पद्धती देण्यात आल्या आहेत. 

हे धडे आज-काल नव्हे तर गेल्या ४६ वर्षांपासून बीएएमएसच्या विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत.  चरकसंहितेत दिलेली ही माहिती विद्यार्थ्यांना शिकवली जात नसल्याचा दावा बीएएमएसच्या प्राध्यापकांनी केला आहे. 

मात्र या वादग्रस्त माहितीचा गैरवापर होत असल्यानं ती वगळण्याची मागणी काही प्राध्यापकांनी केली आहे. पीसीएनडीटी समितीचे सदस्य आणि लेक लाडकी संघटनेचे कार्यकर्ते गणेश बो-हाडे यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. तसंच आरोग्य सेवेच्या अतिरिक्त संचालकांनीही आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे हा भाग वगळण्याची विनंती करणारं पत्र पाठवलं आहे.