मुंबईत उकाडा वाढणार, तर राज्यात पावसाची शक्यता

मुंबईत उकाड्यात वाढ झाल्याने मुंबईकर घामाघूम होत आहेत. रविवार आणि सोमवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान ३४, २६ अंशाच्या जवळपास राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत ढगाळ वातावरण राहील असा अंदाज मुंबई हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे उकाड्यात भर पडणार आहे. 

Updated: May 7, 2017, 09:09 AM IST
मुंबईत उकाडा वाढणार, तर राज्यात पावसाची शक्यता title=

मुंबई : मुंबईत उकाड्यात वाढ झाल्याने मुंबईकर घामाघूम होत आहेत. रविवार आणि सोमवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान ३४, २६ अंशाच्या जवळपास राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत ढगाळ वातावरण राहील असा अंदाज मुंबई हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे उकाड्यात भर पडणार आहे. 

दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी वादळी पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून ७ आणि ८ मे रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहील. ९ मे रोजी मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १० मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान काल सिंधुदुर्गात अवकाळी पावसानं हजेरी लावली. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात रात्री साडेआठच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. स्कायमेटनंही पश्चीम महाराषट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर रात्री पुणे, सांगली आणि चिपुळूणमध्ये अवकाळी पाऊस झाला.