www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
उद्यापर्यंत संप मागे घ्या, असा इशारा देत सरकारनं प्राध्यापकांना शेवटची संधी दिली आहे. उद्या संप मागे घेतला नाही तर प्राध्यापकांवर मेस्मा लावण्याबाबत पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.
प्राध्यापकांचा गेले 93 दिवस संप सुरू आहे. याचसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. प्राध्यापकांच्या सगळ्या मागण्या मान्य करुनही संप मागे न घेतल्यानं मुख्यमंत्री नाराज आहेत. प्राध्यापकांवर मेस्माअंतर्गत कारवाईचा निर्णय होईपर्यंत विद्यापीठानं कारवाई करावी, असे आदेश सरकारनं दिलेत.
जर विद्यापीठांनी प्राध्यापकांवर कारवाई केली नाही तर सरकारच विद्यापीठांवर कारवाई करणार आहे. प्राध्यापकांचा संप सुरू असला तरी सगळे निकाल वेळेत लागतील, असं राजेश टोपेंनी स्पष्ट केलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.