बाळासाहेबांच्या स्मारकासाठी भाडेतत्वावर जागा

महापौर बंगल्याची जागा भाडेतत्वावर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात येणार आहे. याविषयी राज्य सरकारने अध्यादेश जारी केला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 4, 2017, 06:16 PM IST
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी भाडेतत्वावर जागा title=

मुंबई: महापौर बंगल्याची जागा भाडेतत्वावर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात येणार आहे. याविषयी राज्य सरकारने अध्यादेश जारी केला आहे.

स्मारकाबाबत जी ट्रस्ट स्थापन करण्यात आली आहे, त्यांना जागा हस्तांतरीत करण्याबाबत राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे.

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जी जागा देण्यात येणार आहे, त्यासाठी वर्षाला अवघा 1 रुपया भाडे आहे. 30 वर्षांसाठी हा भाडेकरार असेल.

दरम्यान, शिवसेनेचा राग निवळण्यासाठी राज्य सरकारने तातडीने नोटिफिकेशन काढल्याचं बोललं जात आहे. 

कारण कालच कॅबिनेट बैठकीत शिवसेनेने बुलेट ट्रेनला विरोध केला होता. तसंच संजय राठोड यांना यवतमाळच्या पालकमंत्रीपदावरून हटवल्यानेही सेनेने बैठकीतून काढता पाय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने अध्यादेश जारी केला.