लालबाग पुलावरुन बस कोसळली, सहा जखमी

मुंबईतील लालबागच्या पुलावरुन एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात सहा प्रवासी जखमी झालेत. ही बस साताऱ्याहून मुंबईकडे येत होती. ही घटना सकाळी घडली. या अपघाताची चौकशी सुरू झाली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 8, 2013, 02:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतील लालबागच्या पुलावरुन एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात सहा प्रवासी जखमी झालेत. ही बस साताऱ्याहून मुंबईकडे येत होती. ही घटना सकाळी घडली. या अपघाताची चौकशी सुरू झाली आहे.
अपघातातील सहा जखमींना परळ येथील केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
उड्डाण पुलावर चढत असतांना ही बस उड्डाणपुलाच्या कठड्यावरुन १० ते १५ फुट खाली कोसळली. पहाटे सव्वा तीनच्या सुमारास श्री कृष्णा या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची लक्झरी बस कोसळली.
काही प्रवासी मैत्रीपार्क तसेच अन्य ठिकाणी आधीच उतरल्यामुळे बसमध्ये कमी प्रवासी होते अशी माहितीही पोलिसांनी दिली. दरम्यान, या अपघाताची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.