पाण्याचा फुगा महिलेच्या डोळ्यावर आदळला, अन्...

होळीच्या फुगा डोळ्यावर बसल्यानं मीरारोडमध्ये एका महिलेच्या डोळ्याला गंभीर जखम झालीय. वैशाली दमानिया भाईंदर लोकलमधून बोरिवलीला जात असताना चालत्या लोकलमध्ये त्यांच्या डोळ्याला फुगा लागला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 14, 2014, 12:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
होळीच्या फुगा डोळ्यावर बसल्यानं मीरारोडमध्ये एका महिलेच्या डोळ्याला गंभीर जखम झालीय. वैशाली दमानिया भाईंदर लोकलमधून बोरिवलीला जात असताना चालत्या लोकलमध्ये त्यांच्या डोळ्याला फुगा लागला. त्यांच्या डोळ्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाला. सध्या त्यांच्यावर मीरारोडच्या उमराव हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  
३३ वर्षीय वैशाली दमानिया या भाईंदर पूर्व इथं राहतात. डब्यात गर्दी असल्यामुळे दरवाजात उभ्या असतानाच भाईंदर-मीरा रोड रेल्वे स्थानकादरम्यान त्यांच्या डाव्या डोळ्यावर रंगाच्या पाण्यानं भरलेली पिशवी आदळली. यात त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झालीय.
दमानिया यांना उपचारासाठी तत्काळ मीरा रोड इथल्या उमराव हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलं. त्यावेळी त्यांचा डोळा रक्तबंबाळ झाला होता. तसंच डोळ्याच्या कडा फाटल्या होत्या. या कडांना टाके घालण्यात आले आहेत, तत्काळ उपचारामुळेच त्यांचा डोळा बचावला, असं डॉ. अब्दुल हमीद यांनी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.