आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही जम्बो ब्लॉक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टीच्या दुरूस्तीसाठी १ फेब्रुवारीपासून ८ तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 16, 2017, 08:34 PM IST
आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही जम्बो ब्लॉक title=

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टीच्या दुरूस्तीसाठी १ फेब्रुवारीपासून ८ तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. हे काम ३  महिने सुरू राहणार आहे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाणाचे वेळापत्रक कोलमडणार आहे. 

याआधी ऑक्टोबर २०१६ मध्ये पहिल्या टप्प्यात ४० दिवसांत दुरूस्ती करण्यात आली होती. या काळात २ हजार १०० उड्डाणं रद्द करण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यात सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. 

दरदिवशी ८  तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. लहान धावपट्टीच्या कमी क्षमतेमुळे दररोज ७० ते ८० विमाने रद्द झाल्यामुळे तिकीट दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.