मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत दादरच्या बालेकिल्ल्यात चुरशीचा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दादर माहिमच्या 191 वॉर्डमधून भाजपतर्फे खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा ओक सौमय्या यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
हा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्याने सध्याचे मनसेचे नगरसेवक आणि गटनेते संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांना तिकिट मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेकडून माजी महापौर आणि माजी आमदार विशाखा राऊत यांचे नाव पुढे येत आहे. दरम्यान या तिन्ही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणे अजून बाकी आहे. शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत या जागेवरुन खटका उडाला आहे. दोघांनाही हा वॉर्ड हवा आहे.