www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लहान मुलांसाठी जॉन्सन बेबी पावडरचे उत्पादन करणाऱ्या जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या कंपनीचा पुन्हा एकदा परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मालाचे उत्पादन आणि विक्री केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट बजावण्यात आले आहे.
नवजात बालके आणि शिशूंसाठी ही कंपनी उत्पादन करते. मुंबईतील मुलुंड येथील कारखान्यासाठी सौंदर्यप्रसाधने उत्पादनाचा परवाना राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) पुन्हा रद्द केलाय.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार फेरसुनावणी झाल्यानंतर एफडीएने नव्याने आदेश काढत २१ एप्रिलपासून येथील सौंदर्यप्रसाधने उत्पादनाचा परवाना रद्द ठरवण्यात येत असल्याचे कंपनीला नुकतेच कळवले आहे.
एफडीएच्या औषध निरीक्षक आणि अधिकाऱ्यांनी कारखाना स्थळाची पाहाणी करत तपासणी केली. यावेळी जॉन्सन बेबी पावडरच्या १५ बॅचेसमधील अर्थात जवळपास दीड लाख बाटल्या टॅल्कम पावडर जंतूविरहित करण्यासाठी योग्य प्रक्रिया वापरली नसल्याचे स्पष्ट झालेत. पावडरमध्ये एथिलीन ऑक्साईड हे रसायन कर्करोगासाठी कारणीभूत ठरू शकते, असे सांगितले जाते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.