थरांचा थरार आणि `जय जवान`चा विश्वविक्रम

ठाण्याबरोबरच मुंबईतल्या अनेक गोविंदा पथकांनी ठाण्यातल्या प्रसिद्ध दहीहंडींना सलामी दिली. ठाण्यातल्या चौकाचौकात थरांचा थरार शिगेला पोहचवला. ढाक्कुमाकुमच्या तालावर गोविंदा हंडी फोडताना दिसत होते. ठाण्यात संघर्ष प्रतिष्ठान, संस्कृती प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान, आनंद चॅरिटेबल आणि टेंभी नाका या पाच मोठ्या दहीहंड्या होत्या.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 10, 2012, 09:55 PM IST

www.24taas.com, मुंबई
ठाण्याबरोबरच मुंबईतल्या अनेक गोविंदा पथकांनी ठाण्यातल्या प्रसिद्ध दहीहंडींना सलामी दिली. ठाण्यातल्या चौकाचौकात थरांचा थरार शिगेला पोहचवला. ढाक्कुमाकुमच्या तालावर गोविंदा हंडी फोडताना दिसत होते. ठाण्यात संघर्ष प्रतिष्ठान, संस्कृती प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान, आनंद चॅरिटेबल आणि टेंभी नाका या पाच मोठ्या दहीहंड्या होत्या. याठिकाणी सर्वाधिक गोविंदा पथकांनी हजेरी लावत मानवी मनोरे उभे केले.
मुंबई आणि ठाण्यातल्या विविध ठिकाणच्या दहीहंडी उत्सवाला फिल्मी कलाकारांनी उपस्थिती लावली. अभिनेता अक्षयकुमारने ठाण्याच्या संस्कृती दहीहंडीला तर अक्षय खन्नानं ठाण्याच्याच संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीला उपस्थिती लावली. तर घाटकोपरच्या राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवाला नाना पाटेकर, जितेंद्र, मलायक अरोरा-खान आणि महिमा चौधरी यांनी उपस्थिती लावली.
कुर्ल्यातल्या पल्लवी फाऊंडेशन आणि शिवसेना विभाग क्रमांक चारच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात अभिनेत्री भार्गवी चिरमुलेनं आपला परफॉर्मन्स सादर केला
कुर्ल्यातील पल्लवी फाऊंडेशन आणि शिवसेना विभाग क्रमांक चारच्या वतीनंही दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं. दहीहंडीनिमित्तानं याठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनीही पल्लवी फाऊंडेशनच्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी दहीहंडीचे पैसे महापौर निधीला देण्याची विनंती केली.
कुर्ल्यातल्या पल्लवी फाऊंडेशन आणि शिवसेना विभाग क्रमांक चारच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटी जोडी उमेश आणि प्रिया बापट यांनी हजेरी लावली. घाटकोपरमधील राम कदम यांच्या दहीहंडीला अभिनेते नाना पाटेकर यांनी आवर्जून हजेरी लावलीआयटम गर्ल राखी सावंतनेही घाटकोपरच्या राम कदम यांच्या दहीहंडीला हजेरी लावत आपल्या नृत्याची झलक दाखवली.

डोंबिवलीतील आनंद परांजपेंच्या समर्थ प्रतिष्ठानची दहीहंडी अष्टविनायक मंडळानं फोडलीए...सात थर लावून या प्रतिष्ठाननं ही हंडी फोडली... ठाण्याच्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत दोन मंडळांनी 9 थर लावण्याचा विक्रम केलाय.. माझगाव ताडवाडी मित्र मंडळ आणि बोरिवलीच्या शिवशाही मंडळानं 9 थरांची सलामी दिली आहे या दोन्ही मंडळांना 11 लाख रुपय़ांचे बक्षीस मिळाले आहे...