तामिळनाडुच्या मुख्य सचिवांच्या घरावर आयकराच्या धाडी

जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्याच कॅबिनेटचे मुख्य सचिव अशा प्रकारे आयकर विभागच्या रडारवर आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 21, 2016, 11:13 AM IST
तामिळनाडुच्या मुख्य सचिवांच्या घरावर आयकराच्या धाडी title=

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्य सचिव राममोहन राव यांच्या घरावर आयकर विभागं छापा घातला आहे. नोटाबंदीनंतर देशभरात सुरू झालेल्या छापासत्राचा हा भाग असल्याचं बोललं जातंय.

पहाटे साडे पाचवाजता आयकर विभागानं राममोहन राव यांच्या घरावर छापा घातला. 

जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्याच कॅबिनेटचे मुख्य सचिव अशा प्रकारे आयकर विभागच्या रडारवर आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.