गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा

अवैध  25 किलो गांजा बाळगल्याप्रकरणी मुंबईतील विशेष अंमली पदार्थ न्यायालयाने 2 आरोपींना 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावलीय. अंमली पदार्थ तस्करी प्रकरण न्यायालयाने आतापर्यंत दिलेली सर्वात मोठी शिक्षा आहे. 

Updated: Dec 21, 2016, 08:24 AM IST
गांजा बाळगल्याप्रकरणी दोघांना 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा title=

मुंबई : अवैध  25 किलो गांजा बाळगल्याप्रकरणी मुंबईतील विशेष अंमली पदार्थ न्यायालयाने 2 आरोपींना 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावलीय. अंमली पदार्थ तस्करी प्रकरण न्यायालयाने आतापर्यंत दिलेली सर्वात मोठी शिक्षा आहे. 

2014 साली अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने भांडुप येथे सापळा रचून दोघांना अटक केली होती. भागवान पाटील आणि शशिकांत थोरात अशी या दोघांची नावं आहेत. त्यांच्याकडून तब्बल 3 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला होता.

कायदा सक्षम असतो मात्र यासाठी योग्य तपास करून पुरेसे पुरावे गोळा केल्यास आरोपीला मोठी शिक्षा होऊ शकते या निकालावरून स्पष्ट होत आहे.