व्हिडिओ रेकॉर्ड करण्यापेक्षा शिखाचा जीव वाचवायचा होता - शिखाचा भाऊ

मुंबई पोलीस सध्या शिखाच्या मृत्यूचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत. मॉडेल टिव्ही अभिनेत्री शिखा जोशीनं 17 मे ला गळा चिरून आत्महत्या केली. 

Updated: May 20, 2015, 03:04 PM IST
व्हिडिओ रेकॉर्ड करण्यापेक्षा शिखाचा जीव वाचवायचा होता - शिखाचा भाऊ title=

मुंबई: मुंबई पोलीस सध्या शिखाच्या मृत्यूचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत. मॉडेल टिव्ही अभिनेत्री शिखा जोशीनं 17 मे ला गळा चिरून आत्महत्या केली. 

शिखाच्या मृत्यूपूर्वी तिच्या मैत्रिणीनं जो व्हिडिओ शूट केला. त्यात शिखानं डॉ. शर्माचं नाव घेतलंय. मात्र शिखाचा हा व्हिडिओ घेण्यापेक्षा तिला हॉस्पिटलमध्ये नेलं असतं तर तिचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया शिखाच्या भावानं दिलीय. 

शिखाचा व्हिडिेओ काढणाऱ्या तिच्या मैत्रिणीची दोन वेळा पोलिसांनी चौकशी केलीय. तिचा व्हिडिओ बनविण्यामागचा हेतू जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलाय. 

मात्र खरंच जर व्हिडिओ बनविण्यात वेळ घालवला नसता, तर शिखा वाचली असती ही भावाची प्रतिक्रिया योग्यच आहे, असं सामान्य नागरिक आणि नेटिझन्सचंही म्हणणं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.