मुंबई : शीना बोरा हत्याकांडप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय. एका मीडियाचा रिपोर्टनुसार शीना बोरा आपली आई इंद्राणी मुखर्जी हिला ब्लॅकमेल करायची. त्यामुळे इंद्राणी नाराज होती. यातूनच तिने शीना हत्या गळा आवळून केली. रिपोर्टनुसार शीनाने बांद्रा येथे थ्री-बीएचके फ्लॅटची मागणी करत इंद्राणीला ब्लॅकमेल करीत होती.
समाचार पत्र 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार इंद्राणीचा आधीचा कार चालक श्याम राय यांच्या पोलीस चौकशीतून पुढे आले, की शीनाची हत्या गळा दाबून करण्यात आली त्यावेळी इंद्राणी अधिक हिंसक बनली होती. गळा दाबताना इंद्राणी म्हणाली, तुला बांद्रा येथे थ्री बीएचके फ्लॅट हवाय, घे आता. श्याम रायच्या चौकशीत दुसऱ्यांदा गळा दाबून हत्या केल्याचा पुनरुच्चार आला.
शीना इंद्राणीला पीटरच्या समोर सिक्रेट लेटरबाबत उघडण्याची धमकी देत असाची. ज्यावेळी इंद्राणीने याबाबत गप्प राहण्यास सांगितले त्यावेळी शीनाने गप्प राहण्यासाठी फ्लॅटची मागणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहिनुसार शीना राहुलबरोबर लग्न करण्याची तयार झाल्याने इंद्राणी त्रस्त होती. शीनाला वेगळे राहण्याचे सांगितले त्यावेळई शीनाने इंद्राणीला धमकी दिली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.