इंद्राणी मुखर्जीला डेंग्यूची लागण?

शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला डेंग्यू झाल्याची शक्यता आहे. तिची तब्येत ढासळल्याने पुन्हा एकदा तिला जे. जे. रुग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आलेय. 

Updated: Oct 29, 2015, 09:59 AM IST
इंद्राणी मुखर्जीला डेंग्यूची लागण? title=

मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला डेंग्यू झाल्याची शक्यता आहे. तिची तब्येत ढासळल्याने पुन्हा एकदा तिला जे. जे. रुग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आलेय. 

इंद्राणीची प्रकृती बिघडल्याने जे जे रुग्णालयातील डॉक्टरांकडून तुरुंगातच तपासणी करण्यात आली. त्या वेळी तिच्या प्लेटलेट्सची संख्या ६५ हजारांवर उतरली होती. इंद्राणीची तब्येत खालावल्याने तिला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापूर्वी अशक्तपणामुळे बेशुद्ध पडल्यानेही तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

इंद्राणीवर मुलगी शीना बोरा हिची २०१२ मध्ये हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी स्थानिक न्यायालयाने इंद्राणी, तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि वाहनचालक श्यामवर राय याला ३१ ऑक्टोबपर्यंत कोठडी ठोठावली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.