बेस्ट कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनसचा चेंडू

बेस्ट कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनसचा चेंडू मुंबई महापालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेने राज्य सरकारच्या कोर्टात ढकललाय.

Updated: Oct 28, 2015, 11:23 PM IST
 बेस्ट कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनसचा चेंडू  title=

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनसचा चेंडू मुंबई महापालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेने राज्य सरकारच्या कोर्टात ढकललाय.

स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी राज्य सरकारने मदत करण्याविषयीचं पत्र लिहीलेय. 

बेस्ट कर्मचा-यांना बोनस देण्यासाठी आवश्यक असणारी ६० कोटींची रक्कम राज्य सरकारनं द्यावी, अशी विनंती महापालिकेकडून करण्यात आलीय. दिल्ली सरकारनं तिथल्या सार्वजनिक वाहतूक उपक्रमाला आणि गुजरात सरकारने अहमदाबादच्या सार्वजनिक वाहतूक उपक्रमाला शेकडो कोटी रूपयांची मदत केली आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकारनं बेस्टला मदत करण्याची मागणी केलीय.

यामुळे, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसचा भार महापालिका उचलायला तयार नसल्याचंच स्पष्ट झालंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x