मुंबई : चहुकडून टीकेची झोड उठल्यानंतर अभिनेता संजय दत्त याचा वाढीव फर्लोचा अर्ज नामंजूर करण्यात आलाय... तसंच संजय दत्तला आत्मसमर्पण करण्याचे आदेशही देण्यात आलेत.
त्यामुळे, आजच्या आज म्हणजेच शनिवारी संजय दत्तला पुणे येरवडा कारागृहात हजर व्हावं लागणार आहे.
संजय दत्तला १४ दिवसांची मिळालेली फर्लो गुरुवारी ८ जानेवारी रोजी संपली होती... ही फर्लो संपण्याआधीच संजयनं पुन्हा वाढीव फर्लो मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर पुणे कारागृह आणि मुंबई पोलिसांमध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे संजय दत्तनं सुट्टीची मुदत संपल्यानंतरही दोन दिवस घरीच काढलेत.
५५ वर्षीय अभिनेता संजय दत्त सध्या मुंबई बॉम्बस्फोटादरम्यान बेकायदा शस्त्र हाताळल्याप्रकरणी पुणे येरवडा कारागृहात शिक्षा भोगतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.