मुंबईच्या दर्याला आलंय उधाण

मुंबईत आजही दर्याला उधाण आलं आहे. किनाऱ्यावर लाटांचं तांडव पाहायला मिळालं. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर 4.95 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. लाटांचा आनंद घेण्यासाठी मरिन लाईन्स, गेट वे, वरळी सी फेसवर मुंबईकरांनी गर्दी केली होती.

Updated: Jul 15, 2014, 06:34 PM IST
मुंबईच्या दर्याला आलंय उधाण title=

मुंबई : मुंबईत आजही दर्याला उधाण आलं आहे. किनाऱ्यावर लाटांचं तांडव पाहायला मिळालं. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर 4.95 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. लाटांचा आनंद घेण्यासाठी मरिन लाईन्स, गेट वे, वरळी सी फेसवर मुंबईकरांनी गर्दी केली होती.

मुंबईच्या समुद्रकिनारी आज उंचच उंच लाट उसळतांना पाहायला मिळणार आहेत. या लाटा 4.95 मीटर उंचपर्यंत उसळत आहेत. दर्याला आलेलं हे उधाण पाहाण्यासाठी मुंबईकरांनी मरिन लाईन्स, गेट वे आणि वरळी सी फेसवर गर्दी केली आहे. मात्र लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईत काल भरती होती, मात्र पाऊसच अचानक गायब झाल्याने कोणताही परिणाम झाला नाही, मात्र आता भरती दरम्यान मुसळधार पाऊस आला, तर समुद्र काठावरचं पाणी रस्त्यावर येऊ शकतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.