मुंबई : शिवस्मारकासाठी निधीची तरतूद राज्य सरकार कशी करणार असा सवाल मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला विचारलाय.
मोहन भिडे यांनी शिवस्मारकाच्या उभारणीला विरोध करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल केलीय. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टानं हा सवाल उपस्थित केलाय.
राज्याची आर्थिक परिस्थिती मजबूत नसताना शिव स्मारक उभारण्याचा अट्टाहास का असा सवाल हायकोर्टानं विचारलाय. याबाबत तीन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने राज्य सरकारला दिलेत.