मेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टाची स्थगिती, पण आता नवे दर

मुंबईत मेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टानं स्थगिती दिलीय. ९ जुलैपासून रिलायन्सकडून प्रस्तावित केलेली 10 ते 40 रूपये भाडेवाढ सरसकट करता येणार नाही, मात्र 0-3 किमीपर्यंत 10 रूपये. 3-8 किमीपर्यंत 15 रूपये तर 8-11 किमी पर्यंतच्या टप्यासाठी 20 रूपये दर आकारायला परवानगी देण्यात आलीय. ही भाडेवाढ 31 जुलैपर्यंत लागू राहील. 

Updated: Jul 7, 2014, 08:34 PM IST
मेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टाची स्थगिती, पण आता नवे दर title=

मुंबई: मुंबईत मेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टानं स्थगिती दिलीय. ९ जुलैपासून रिलायन्सकडून प्रस्तावित केलेली 10 ते 40 रूपये भाडेवाढ सरसकट करता येणार नाही, मात्र 0-3 किमीपर्यंत 10 रूपये. 3-8 किमीपर्यंत 15 रूपये तर 8-11 किमी पर्यंतच्या टप्यासाठी 20 रूपये दर आकारायला परवानगी देण्यात आलीय. ही भाडेवाढ 31 जुलैपर्यंत लागू राहील. 

त्या दरम्यान सरकारनं फेअर फिक्सेशन समितीची लवकर स्थापना करून, त्यांचा अहवाल मागवावा आणि सुधारित दर लागू करावेत, असं सांगण्यात आलंय. याची पुढची सुनावणी २४ जुलैला होणार आहे. 

मेट्रोचे प्रस्तावित दर 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये आणि 40 रुपये अशी होती. मात्र तूर्तास हा तिकीटदर लागू होणार नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.