वकील पल्लवीच्या हत्येप्रकरणी सज्जादला जन्मठेप

पल्लवी पूरकायस्थ या वकील तरुणीच्या हत्येप्रकरणी आरोपी सज्जाद पठाणला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी 3 जुलैला दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला. 

Updated: Jul 7, 2014, 02:02 PM IST
वकील पल्लवीच्या हत्येप्रकरणी सज्जादला जन्मठेप title=

मुंबई : पल्लवी पूरकायस्थ या वकील तरुणीच्या हत्येप्रकरणी आरोपी सज्जाद पठाणला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी 3 जुलैला दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला. 

या प्रकरणातला दोषी आरोपी सज्जाद मुगलला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी पल्लवीच्या आई-वडिल तसंच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली होती.

9 ऑगस्ट 2012 ला पल्लवीची इमारतीचा वॉचमन सज्जाद मुगलनं हत्या केली होती.

वडाळा इथल्या भक्ती पार्क या पॉश वस्तीतल्या हिमालयन हाईट्स इमारतीत ती राहत होती. तर एका प्रसिद्ध सिनेनिर्मिती कंपनीची ती कायदेशीर सल्लागार होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.