राज्यात अनेक ठिकाणी धो-धो पाऊस

राज्यात बहुतेक जिल्ह्यात उशीरा का होईना पण समाधानकारक पावसाला सुरूवात झाली आहे. विदर्भात नद्यांना पूर आला आहे. 

Updated: Jul 24, 2014, 10:27 AM IST
राज्यात अनेक ठिकाणी धो-धो पाऊस title=

मुंबई : राज्यात बहुतेक जिल्ह्यात उशीरा का होईना पण समाधानकारक पावसाला सुरूवात झाली आहे. विदर्भात नद्यांना पूर आला आहे. 

खानदेशातील तापी दुथडी भरून वाहत असली, तर गिरणा नदीच्या उगम क्षेत्रात अजुनही पाऊस नसल्याने गिरणा धरणाच्या पातळीत कोणतीही वाढ झालेली नाही. पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पावसाची प्रतिक्षा आहे.

पावसाला उशीर झाल्याने अजुनही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आलेलं नाही. कारण उशीरा पाऊस झाल्याने पेरण्यांना अजून महिनाही उलटलेला नाही. त्यामुळे पुढील पाऊसमानाची चिंता कायम आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.