मुंबई : जागावाटपावरुन काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जाहीर शाब्दीक चकमक सुरू असताना याच मुद्द्यावरुन दोन्ही पक्षाच्या समन्वय समितीची बैठक काल रात्री उशीरा मुंबईत पार पडली.
या बैठकितही राष्ट्रवादीनं 144 म्हणजेच 50 टक्के जागांची मागणी पुढे करत काँग्रेसवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला मात्र, काँग्रेसनं राष्ट्रवादीची ही मागणी धुडकावून लावलीय.
लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादीनं जास्त जागा जिंकल्या आहेत त्यामुळे विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीला जास्त जागा हव्यात असा राष्ट्रवादीचा दावा आहे. 2009 च्या विधानसभा जागावाटपाच्यावेळी हाच फॉर्म्युला वापरण्यात आला होता, हेही कारण राष्ट्रवादीनं पुढे केलं.
मात्र, काँग्रेसनं राष्ट्रवादीची मागणी धुडकावत निम्म्या जागा देण्यास नकार दिलाय. दरम्यान, काही जागांची अदलाबदली करण्यास तयार असल्याचं सांगत काँग्रेसनं आपला ‘उदारपणा’ दाखवलाय.
या समनव्यय समितीत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजीत पवार प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, आणि प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि प्रभारी मोहन प्रकाश उपस्थित होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.