राज्यात २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात  येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. 

Updated: Jul 20, 2016, 12:47 PM IST
राज्यात २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता title=

मुंबई  : राज्यात  येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. 

मागील चोवीस तासांत कोकण-गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.  तसेच पश्चिम समुद्र किनाऱ्यावर दक्षिण महाराष्ट्र ते केरळच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे.

विदर्भात बहुतांश ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली.

२० ते २३ जुलै या काळात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस पडेल .२० ते २१ जुलै या काळात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील,असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.