मुंबईत पावसाची दमदार हजेरी, लोकल वाहतूक उशिराने

मुंबईत पावसाने आज सकाळपासूने पावसाने जोरदार हजेरी लावलीय. दादर, परळ, वरळी, सायन घाटकोपर भागात सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय. 

Updated: Aug 5, 2016, 12:04 PM IST
मुंबईत पावसाची दमदार हजेरी, लोकल वाहतूक उशिराने title=

मुंबई : मुंबईत पावसाने आज सकाळपासूने पावसाने जोरदार हजेरी लावलीय. पावसानं पहाटेपासूनच हजेरी लावलीय  दादर, परळ, वरळी, सायन, घाटकोपर भागात सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय. 

याचा परिणाम लोकल वाहतुकीवर तसेच रस्ते वाहतुकीवरही झालाय. आधीच खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचाकांचे हाल होत असताना, आजच्या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याचं दिसतयं आणि याचा परिणाम ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडीही दिसून येते. 

तर आजच्या पावसामुळे दादरमधल्या दुपारच्या सत्रातील काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हिंदमाता भागात सखल भागात पाणी साचल्यानं वाहनचालकांना मोठ्या समस्यांना तोंड द्याव लागतंयं.