मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी राहण्यास राजन वेळूकर पात्र नाहीत, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे वेळूकर यांना आता पाय उतार व्हावे लागणार आहे.
राजन वेळूकर यांची कुलगुरू या पदासाठीची निवड योग्य नसल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. कुलगुरूंच्या पदासाठी आखून देण्यात आलेले शिक्षणाचे आणि अन्य निकष डावलून वेळूकर यांची चुकीच्या पद्धतीने निवड करण्यात आल्याचे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलेय.
यापूर्वी स्वत:विषयी चुकीची माहिती पुरविल्याच्या मुद्द्यावरून वेळूकर वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. विद्यापीठाचे माजी कुलगुरू ए. डी. सावंत यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा निकाल देण्यात आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.