लोकलमधील भजनी मंडळ आता बंद!

मुंबईतील उपनगरीय रेल्वेडब्यांत भजन करण्यास आता रेल्वे पोलिसांनी बंदी घातलीय. अशा भजनीमंडळांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे आयुक्तांनी दिलेत.

Updated: Dec 11, 2014, 05:43 PM IST
लोकलमधील भजनी मंडळ आता बंद! title=

मुंबई: मुंबईतील उपनगरीय रेल्वेडब्यांत भजन करण्यास आता रेल्वे पोलिसांनी बंदी घातलीय. अशा भजनीमंडळांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे आयुक्तांनी दिलेत.

लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना अनेकदा उभ्यानंच प्रवास करावा लागतो. अशात सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास रेल्वेडब्यांतील भजनी मंडळांच्या आरेरावीचे प्रकार वाढल्यानं प्रवाशांना त्रास होतोय. या भजनी मंडळांत 10 ते 12जण असल्यामुळं प्रवासी त्यांची तक्रार करण्यास घाबरतात मात्र एका प्रवाशानं रेल्वे पोलिसांच्या फेसबूकवर तक्रार केल्यानं काल या भजनीमंडळांवर रेल्वे पोलिसांनी कारवाई केलीय.

प्रवाशांची तक्रार आल्यास यापुढंही तातडीनं अशी कारवाई करण्यात येईल, असं रेल्वे पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी दिलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.