मुंबई : पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली गुरुवारी मुंबईमध्ये येणार असून त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. सुहेब इलियासी यांच्या घर वापसी या चित्रपटाच्या म्युझिक लाँच होणार असून त्या कार्यक्रमासाठी गुलाम अली आले असल्याचं इलियासी यांनी म्हटलं आहे.
या चित्रपटात गुलाम अलींचीही भूमिका असून त्यांनी एक देशभक्तीचं गाणंही म्हटलं असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार या दोघांनी गुलाम अलींच्या या भेटीसाठी पुरेसं संरक्षण द्यावं अशी विनंती इलियासी यांनी केली आहे. गेल्यावर्षी गुलाम अलींच्या कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केला होता, परिणामी गुलाम अलींचा मुंबई व पुण्याचा नियोजित दौरा रद्द करावा लागला होता. त्या आता शुक्रवारी होणाऱ्या या कार्यक्रमाकडे शिवसेना आणि मनसे काय भूमिका घेते हे पहावं लागेल.
गुलाम अलींना विशेष अतिथीप्रमाणे मान मिळावा असंही इलियासी यांनी म्हटलं आहे. घर वापसी हा चित्रपट असहिष्णूतेवरील वाद विवादावर असल्याचं इलियासी यांनी म्हटलं आहे.